
बार्शी : बार्शी तालुक्यातील गोरगरीब लोकांना उपाशी ठेवून, त्यांच्या तोंडाचा घास पळवून, रेशन दुकानातून काळाबाजारात नेलेला 33 लाख रुपयांचा 110 टन तांदूळ (2 हजार 220 पोती) पनवेल पोलिसांनी पकडला.

याप्रकरणी बार्शी बाजार समितीतील वादग्रस्त व्यापारी भिमाशंकर खाडे यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह तिघांविरोधात नवी मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्याची माहिती बार्शीत कळताच महसूल अधिकारी, रेशन दुकानदार यांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोनामुळे सर्वत्र नाकेबंदी आणि संचारबंदी असतानाही रेशन दुकानातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर तांदूळ गोळा करुन तो सर्व अडथळे पार करुन मुंबईपर्यंत पोहचल्यामुळे जिल्हा प्रशासनाची मोठी नाचक्की झाली आहे.

आला होता.
पळस्पे येथे गोडावून मध्ये ठेवण्यात आले होते तांदूळ लाॅकडाऊनमध्ये गोरगरिबांसाठी असलेला रेषांचा तांदूळ ठेवला विक्रीसाठी पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील टेक केअर लॉजीस्टिक, पळस्पे येथील पलक रेशन गोडावून येथे शासनाने कोवीड १९ या साथीच्या आजारामध्ये गोरगरीबांना पुरविण्यात येणारे रेशन धान्य गरजू पर्यत पोहोचविण्यासाठी तसेच वितरीत करण्यासाठी दिलेल्या रेशन मालाचा अवैधरित्या साठा करून काळ्याबाजाराने विक्री केली जात असल्याची गोपनीय माहीती पनवेल शहर पोलिसांना मिळाल्यानंतर महसूल खात्याचे अधिकारी सोबत घेऊन ३ लाख ८ हजार रुपयांचा रेशन तांदळाचा साठा जप्त करण्यात आला तसेच तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस सह आयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस उप आयुक्त अशोक दुधे यांनी यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्ह्याची उकल करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश मिळाले. दिनांक ०१/०८/२०२० रोजी पनवेल शहर पोलीस स्टेशन, नवी मुंबई यांनी ११० टन शासकिय रेशन तांदुळाचा काळ्याबाजारातील साठा जप्त केला. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पनवेल शहर ठाणेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २. पनवेल यांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे टेक केअर लॉजीस्टिक,पळस्पे येथील पलक रेशन गोडावुन येथे जावून दोन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी आरोपीनी शासनाने कोवीड १९ या साथीच्या आजारामध्ये गोरगरीबांना पुरविण्यात येणारे रेशन धान्य गरजू पर्यत पोहचणेकामी वितरीत करण्यासाठी दिलेल्या मालाचा बार्शी जि.सोलापूर येथून चार कंटेनर मधुन अवैध वाहतुकीव्दारे जमा करून त्यामध्ये भेसळ करून मालाची विक्री करण्याच्या उददेशाने साठा केल्याचे दिसून आल्याने, सदरचा माल दोन पंचासमक्ष हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये भेसळ माफिया म्हणून तिघांना तांब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये १) भिमाशंकर रंगनाथ खाडे. २) इकबाल काझी ३) लक्ष्मण चंद्र पटेल यांना रंगेहाथ अटक करून ३३,०८,०००/- रूपये किंमतीचा रेशनिंग तांदुळाच्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या एकण २२२० गोण्या (सुमारे ११० टन) त्यामध्ये Asian Rice लोगो असलेल्या व 1) Food Corporation of India 2) Government of Punjab 3)Government of Haryana असे नाव असलेल्या गोण्या व दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे हस्तगत करण्यात आले. यातील आरोपी भिमाशंकर रंगनाथ खाडे याच्यावर भोईवाडा पोलीस ठाणे येथे भा.द.वि.कलम ४२०, ४०६, ५०० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
यावेळी या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी सपोनि/निलेश राजपुत, पोलीस उप निरीक्षक दिपक कादबाने, पाहवा/९३५ नितीन वाघमारे, पोना/२१३६ पंकज पवार, पोना/२४३० प्रोण चौधरी तसेच महसूल विभागातील मडळ अधिकारी श्री.संतोष मोतीराम पाटील व पुुुुुुरवठा लेखा अव्वल कारकून अर्चना नितीन घरत, तलाठी पळस्पे तेजराव तवर यांनी केली. याबाबत अधिक तपास पोलिस उपायुक्त परिमंडळ २ पनवेेल व सहा. पोलिस आयुक्त पनवेेल व सपोनि निलेश राजपुत हे करीत आहेत.

साभार सुराज्य डिजिटल
