कोल्हापूर जिल्ह्यात 12 तासात 304 ची वाढ; इचलकरंजी आघाडीवर; आजवर 99 मृत्यू

0
322

कोल्हापूर: गेल्या १२ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरश: कहर झाला आहे. जून महिन्यात कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असताना जुलै महिना जिल्ह्यासाठी काळ बनून आला आहे. जिल्ह्यात आज (ता.२४) गेल्या तीन महिन्यातील सर्वांत विक्रमी बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत तब्बल ३०४ बाधितांची नोंद झाली आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९९ मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूदरातही गेल्या दहा दिवसात चिंताजनक वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर नव्याने आव्हान निर्माण झाले आहे. आज इचलकरंजीमध्ये तब्बल ५० बाधितांची भर पडली. दुसरीकडे गडहिंग्लज तालुक्यात कोविड सेंटरमध्ये एकाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली.जिल्ह्यात पहिल्या हजार रुग्णांचा टप्पा पार करण्यासाठी तब्बल १०४ दिवसांचा कालावधी लागला होता.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यानंतर रेड झोनमधून अनेकजण जिल्ह्यात परतू लागल्यने पुढील हजाराचा टप्पा अवघ्या ११ दिवसात गाठला गेला. त्यानंतर रुग्णवाढीचा वेग मंदावला होता. तथापि गेल्या नऊ दिवसांत जिल्ह्यात बाधितांची संख्या सरासरी दोनशेच्या घरात वाढत आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसात जिल्ह्यात बाधितांचा आकडा हजारावर गेला आहे.

कोल्हापूर शहरात रुग्णसंख्या वाढतच गेल्याने तब्बल ८१ कंटेन्मेंट झोन झाले आहेत. शहरातील व्यापारपेठा असलेल्या गांधीनगर, इचलकरंजी आणि हुपरीमध्येही रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. जिल्ह्यात आज टाळेबंदीचा पाचवा दिवस आहे, तरीही कोरोनाबाधितांची संख्या विक्रमी वेगाने वाढत आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ हजार १०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ६३८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात अवघ्या १५ दिवसांत तब्बल २ हजार रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्णसंख्येच्या वाढीचा वेग तिप्पट झाला आहे. ही वाढ पाहता येत्या ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५ हजारांपर्यंत जाऊ शकते, अशी शक्यता आरोग्य विभागाने व्यक्‍त केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने जिल्ह्यातील मृत्यूदर दुप्पट झाला आहे तर रिकव्हरी रेट सुमारे ५७ टक्क्यांनी घटला आहे.

जिल्ह्यात वाढत्या रुग्ण संख्येबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटवरही परिणाम झाला आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण आणि त्या तुलनेत नव्याने आढळून येणार्‍या रुग्णांची संख्या, यामुळे रिकव्हरी रेट थेट ९० टक्क्यावरून ३३ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात ७ जुलैपर्यंत १६ जणांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर मात्र गेल्या १५ दिवसांत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या कालावधीत ६२ मृत्यू वाढले आहेत.

हे प्रमाण पाहता जिल्ह्यात १५ दिवसांत मृत्यूचे प्रमाणही तिप्पट झाले आहे. जिल्ह्यात ७ जुलै रोजी रुग्णसंख्या एक हजार इतकी झाली. त्यानंतर १५ दिवसांत दोन हजार रुग्ण वाढले. पहिले हजार रुग्ण होण्यासाठी १०४ दिवसांचा कालावधी लागला. पुढचे हजार रुग्ण मात्र, ११ दिवसांत तर त्यापुढचे हजार रुग्ण अवघ्या चार दिवसांत झाले. अशीच परिस्थिती कायम राहिली तर जिल्ह्यात ३१ जुलैअखेर रुग्णसंख्या पाच हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढीमुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

वाढत्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमुळे कोरोना रुग्णालये फुल्‍ल झाली आहेत. कोरोना काळजी केंद्रांची संख्याही वाढवली जात असून तीन हजार बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयेही ताब्यात घेतली जाणार आहेत. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरी स्वतंत्र व्यवस्था असले तर घरी तसेच हॉटेलवरही उपचार घेण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरू आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here