उजनीतून भीमेत पुन्हा 30 हजार क्युसेकने विसर्ग, धरण 111.05%

0
190

पंढरपूर– उजनी धरण 111.05 टक्के भरले असून मंगळवारी सकाळपर्यंत धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पातून 30 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

सोमवारी उजनीतून सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले होते. मात्र रात्री उजनीसह पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला आहे. भीमानगरला 22 मि.मी. ची नोंद आहे. मंगळवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता उजनीतून भीमेत 16 दरवाजे 0.44 मीटरने उघडून 30 हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते. याचबरोबर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग सुरू रू आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

वीर धरणातून 800 क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. भीमा नदी मंगळवारी 15 सप्टेंबर ला संगम येथे 23 हजार तर पंढरपूरजवळ 13 हजार क्युसेकने वाहात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here