बार्शी तालुक्यात शनिवारी ३० कोरोना रुग्ण वाढले; वाचा सविस्तर कोणत्या गावातील व भागातील आहेत रुग्ण
बार्शी : शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात पसरत असुन गेली काही दिवसांपासुन कोरोनाबाधित रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवाला ३० बाधित रुग्ण वाढले आहेत. यामध्ये ग्रामिण मध्ये १९ तर शहरात ११ रुग्ण सापडले आहे तर ४३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले



बार्शी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढत असुन शहरासह तालुक्यातील अनेक भागावर कोरोना विषाणू पसरत आहे. प्रशासनाच्या पुढे कोरोनाला रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आज शहरातील ११५ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी १०४ अहवाल निगेटिव्ह आले तर शहरातील राऊळ गल्ली ३ उपळाई रोड २ राऊत गल्ली ३ गाडेगाव रोड २ मंगळवार पेठ १ असे ११ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले.
तर ग्रामिण मध्ये वैराग १ शेलगाव १ पिंपरी आर १ घारी ५ धामनगाव २ साकत २ कांदलगाव १ सुर्डी १ दडशिंगे १ लाडोळे ३ सारोळे १ असे १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले बार्शी तालुक्यात एकुण १२३४ कोरोना बाधित आकडा असला तरी ७८४ रुग्ण बरे होऊन घरी घेले आहेत तर ४०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत .