रेशन दुकानदारकडून लाच घेताना कळंब च्या महिला नायब तहसीलदारासह 3 जण अटक

0
223

उस्मानाबाद / कळंब – ग्लोबल न्यूज , अमर चोंदे

लॉकडाउन काळात नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य सरकारने प्रत्येक रेशन दुकानातून मोफत धान्य वाटप केले होते, या धान्याचे मोफत वाटप केल्याच्या बदल्यात दुकानदार याना मेहनताना स्वरूपात कमिशन देण्याचा निर्णय घेत काही रक्कम दिली मात्र ही रक्कम वाटप करताना त्यात कमिशन मागणाऱ्या नायब तहसीलदार व रेशन दुकान संघटनेचे अध्यक्षासह एकास उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यात पुरवठा विभागाचे अधिकारी त्यांच्या दलालामार्फत मोफत धान्य वाटपाच्या बिलाची रक्कम दुकानदारांना वाटप करताना कमिशन स्वरूपात वसुली करीत आहेत याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. पुरवठा विभागाच्या काही अधिकारी यांनी त्यांच्या मर्जीतले काही रेशन दुकानदार या कामासाठी दलाल स्वरूपात वसुलीसाठी कामाला लावले आहेत.

लॉकडाउन काळात आलेले मोफत धान्य वाटप केल्याच्या बदल्यात रेशन दुकानदारांना त्याचे प्रत्येकी एक क्विंटलमागे 150 रुपये प्रमाणे शासनाकडून बिल मिळते मात्र हे बिल काढण्यासाठी 6 हजार 700 रुपयांची लाच घेताना नायब तहसीलदार यांच्यासह 3 जणांना अटक केली आहे. कळंब येथील एका तक्रारदार रेशन दुकानदार याचे मागील तीन महिन्याचे 44 हजार 623 रुपये बिल काढण्यासाठी 6 हजार 693 रुपयांची लाच मागणी करून 6 हजार 700 रुपये लाच रक्कम स्विकारल्याने राशन दुकानदारांसह नायब तहसीलदार (पुरवठा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. 

कळंब तहसील कार्यालय येथील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार श्रीमती परविन उमर दराज खान पठाण ( वय 47 वर्ष ) यांच्यासह कळंब तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनाचे अध्यक्ष श्रीरंग साधू डोंगरे ( वय 64 वर्ष रा. कोथळा, तालुका कळंब ) स्वस्त धान्य दुकानदार विलास ज्ञानोबा पिंगळे ( वय 55 वर्ष, राहणार पाथर्डी, तालुका कळंब) या 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार याच्याकडून बिलाच्या रकमेचे पंधरा टक्के म्हणजे 6 हजार 693  रुपये लाचेची मागणी करून आरोपी डोंगरे यांच्या मार्फतीने पंचांसमक्ष ही लाचेची रक्कम स्वीकारलेने कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबादयांचे  मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार  इफ्तेकर शेख, विष्णू बेळे, विशाल डोके , अविनाश आचार्य, अर्जुन मारकड चालक तत्तात्रय करडे यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( 9527943100) 

गौरीशंकर पाबळे, पो. नि, ला. प्र. वी. उस्मानाबाद ( 8888813720) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here