ग्लोबल न्यूज- देशात मागील 24 तासांत 18,653 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर 507 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5,85,493 वर जाऊन पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 3,47,979 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून 2,20,114 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात आत्तापर्यंत 17,400 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात मागील 24 तासांमध्ये 13,157 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमध्ये देशातील 85.5 टक्के करोनाचे रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात 1,74,761 इतक्या रुग्णांची नोंद झाली असून 90,911 रुग्ण बरे झाले आहेत तर 7,855 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर आता पुन्हा तमिळूनाडमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
तमिळनाडूमध्ये रुग्णसंख्या 86,224 झाली असून दिल्लीमध्ये एकूण रुग्णसंख्या 85,161 झाली आहे.
आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 30 जूनपर्यंत एकूण 86,26,585 चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मागील 24 देशात 2,17,931 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना संबंधित लस संशोधनाचा आढावा घेतला. ‘भारत बायोटेक’ या कंपनीनं तयार केलेली ‘कोवॅक्सिन’ या लसीला मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस वैश्विक व माफक दरात उपलब्ध करण्यासंबंधी आवाहन केले आहे.