सोलापूर: सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात (महानगर पालिका) वगळून बुधवारी रात्री उशिरा मिळालेल्या रिपोर्टनुसार 283 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 211 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी गुरुवारी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4584 इतकी झाली आहे. यामध्ये 2769 पुरुष तर 1815 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 136 जणांचा मृत्यू झाला आहे यात 91पुरुष तर 45 महिलांचा समावेश होतो.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1666 आहे .यामध्ये 1022 पुरुष 644 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2782 यामध्ये 1665 पुरुष तर 1126 महिलांचा समावेश होतो.