‘वंदेभारत’ अभियानांतर्गत 182 विमानाने 28 हजार प्रवासी मुंबईत दाखल

0
317

ग्लोबल न्यूज – परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम महाराष्ट्र शासनाकडून सातत्यपूर्ण रितीने सुरुच आहे. आतापर्यंत 182 विमानांनी 28 हजार 435 नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत.

यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 10 हजार 347 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 9 हजार 752 आहे. तर इतर राज्यातील 8 हजार 336 प्रवासीही आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत. 15 जुलै 2020 पर्यंत राज्यात आणखी 40 विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना या अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करून घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या 24 मे 2020 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याचे काम करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.

‘वंदेभारत’ अभियान जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि. आदी विभाग समन्वयाने काम करीत आहेत. वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

‘या’ देशातून आले प्रवासी

वंदे भारत अभियानांतर्गत भारतात आलेले प्रवासी प्रवासी विविध देशातून आले असून ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आयर्लंड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशिअस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, इथिओपिया,रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व आफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्यूयार्क, जॉर्जिया, कामेरुन आदी देशातून आले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here