सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात बुधवारी 266 कोरोना बधितांची भर; 11 जणांचा मृत्यू

0
245

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) बुधवार 7 आँक्टोबर रोजी एकूण 266 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 72 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 207 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

बुधवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 11 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26949 इतकी झाली असून यापैकी 21145 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 5054 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 207 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 741 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 11 जण मयत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here