बार्शी शहर व तालुक्यात तीन दिवसात सापडले 265 कोरोना रुग्ण

0
84

बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक; तीन दिवसात तब्बल 265 कोरोना बधितांची भर

बार्शी  : बार्शी शहर व तालुक्‍यात दुसऱ्या टप्प्यात कोरोना विषाणूची वाढ काही केल्या थांबल्यास तयार नाही.मागील आठवड्यात तब्बल साडेतीनशे रुग्ण सापडल्यानंतर सोमवार ते बुधवार या तीन दिवसात तर कोरोना ने कहर केला. सोमवारी एका दिवसात तब्बल 102 रुग्ण आढळून आले. तर मंगळवारी देखील 95 तर बुधवारी 68 रुग्ण आढळून आले. यात शहरात 198 तर ग्रामीण भागातील 65 रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ  एस के गायकवाड यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोमवारी शहरात 678 आणि ग्रामीण भागात 680 अँटीजेन  तर 514 आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत. मंगळवारी शहरात 1056 आणि ग्रामीण भागात 501 अशा 1557 अँटीजेन चाचण्या केल्या. बुधवारी 1254 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.दोन दिवसात 121 जण उपचारानंतर बरे झाले.आनंदाची बाब म्हणजे तीन दिवसात एकही मृत्यू नाही.

शहरात अलीपुर रोड, सुभाष नगर, उपळाई रोड, नाईकवाडी प्लॉट,भीमनगर ,मंगळवार पेठ, अलीपुर रोड आदी भगत जास्त रुग्ण सापडले आहेत. तर वैराग,खांडवी,भालगाव मध्ये जास्त रुग्ण आढळुन आले आहेत.

बार्शीत कोरोना ला रोखण्यासाठी आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासन दक्ष झाले आहे.यासाठी दिनांक 8 मार्च रोजी प्रत्यक्ष व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन मालक व कामगार यांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. या 15 दिवसात एकूण 4553 जणांच्या चाचण्या केल्या त्यात 98 जण पॉझिटिव्ह आढळले. तर इतर सेन्टर ,ग्रामीण रुग्णालय याठिकाणी ही चाचण्या घेतल्या जात आहेत. हाय रिक्स मधील नागरिकांची ही चाचणी घेतली जात आहे. यामुळेच रुग्ण संख्या वाढत आहे. मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष गायकवाड हे सातत्याने आढावा घेत आहेत.

अँटिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढवले

मागील आठवड्यात प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी बार्शीत अँटीजेन टेस्ट वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे चाचण्यांची संख्या ही वाढली आहे.सोमवारी अँटीजेन आणि आरटिपीसीआर मिळून 1683 तर मंगळवारी 1746 तपासण्या केल्या आहेत.

भागवत मंदिराच्या प्रवेशद्वारावर ही तपासणी शिबीर सुरू केले आहे. यात 4 दिवसात 485 टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 27 जण पॉझिटिव्ह निघाले असल्याचे तुषार खडके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here