बापरे…! बार्शीत बुधवारी सापडले २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ,एकुण संख्या पोहचली २३६ वर

0
178

बार्शीत बुधवारी सापडले २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ,एकुण संख्या पोहचली २३६ वर

भालगाव मध्ये ५ रुग्ण आढळले
एकुण संख्या पोहचली २३६ वर

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गणेश भोळे

बार्शी :बार्शी तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत दररोज होत असलेल्या वाढीमुळे बार्शी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने दररोज कोरोनाची साखळी वाढतच चालली आहे बुधवार दि १५ रोजी आलेल्या अहवालात पुन्हा तालुक्यात २३ कोरोना चे रुग्ण आढळले आहेत . यामुळे एकूण संख्या २३६ वर पोहचली आहे .

बार्शी शहरासह वैराग भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांत भरमसाठ वाढ होत असुन याची साखळी तयार होत आहे . यामुळे अनेक कुटुंबचे कुटुंब याच्या विळख्यात अडकत चालले आहेत यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होत आहे .

बुधवार रोजी आलेल्या अहवालात
भवानी पेठ ४ रुग्ण , खुर्पे बोळ १ रुग्ण, किराणा रोड १ रुग्ण ,मल्लाप्पा धनशेट्टी रोड १ रुग्ण, मांगडे चाळ १ रुग्ण पवार प्लॉट उपळाई रोड १ रुग्ण,


शिवाजी नगर १ रुग्ण ,सुभाष नगर १ रुग्ण, असे शहरात ११ तर ग्रामिण भागात भालगाव ५ रुग्ण, दहिटणे १ रुग्ण,हळदुगे १ रुग्ण,सासुरे १ रुग्ण, उंडेगाव १ रुग्ण व वैराग येथे ३ रुग्ण असे एकुण तालुक्यात २३ रुग्ण आढळले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here