बार्शी तालुक्यात आढळले १८ कोरोना बाधित रुग्ण तर एकाचा मृत्यु; 209 अहवाल प्रलंबित
एकूण रुग्णसंख्या ९६७ तर आत्तापर्यंत मृत्यू ३३

बार्शी : बार्शी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी १८ ने वाढ झाली असून एकूण बाधितांची संख्या ९६७ वर पोहचली आहे. बार्शी तालुक्यात कोरानाचा वाढता प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे.

गेल्या काही दिवसात बार्शी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे अनेक कुटुंबच्या कुटुंब या कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. मागील काही दिवसात बार्शी तालुक्याती ग्रामिण भागातील काही गावे अटोक्यात येत आहे मात्र बार्शी शहरातील रुग्ण वाढ सुरुच आहे

दि १ ऑगस्ट रोजी आलेल्या शहरातील १ स्वब व २१३ रॅपीड अॅन्टीजन असे २१४ जनांचे अहवालापैकी १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे .यात शहरामध्ये तुळजापुर रोड – १ ,बारबोले प्लॉट -१, सिद्धार्थ नगर -१, देशमुख प्लॉट -१ ,ढगे मळा -१ ,उपळाई रोड दोन लिंब -१, जामगाव रोड – ३ ,ब्राम्हण गल्ली -१ , मंगळवार पेठ -१, कापड गल्ली -१ ,असे १२ बाधित रुग्ण सापडले आहे . तर ग्रामिण मध्ये भोयरे येथे ४ रुग्ण , वैराग १ सौदरे -१ असे ६ रुग्ण सापडले आहेत

आज दिवस भरात ९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. तर एका रुग्णाचा मृत्यु झाला आहे . २०९ जणांचे अहवाल प्रलंबित आहे.