पंढरपूर – आज बुधवारी 22 जुलै रोजी पंढरपूर शहरात 17 तर ग्रामीणमध्ये 1 असे एकूण 18 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 251 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

आज 55 अहवाल मिळाले पैकी 37 निगेटिव्ह आहेत. 18 पाँझिटिव्ह आहेत. अद्याप 186 अहवाल प्रलंबित आहेत. ग्रामीण भागात कौठाळीत 1 रुग्ण आढळला आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आजवर 51 जण बरे झाले आहेत. तर 3 जण मयत आहेत. शहरातील 147 तर ग्रामीण मधील 49 व इतर तालुक्यातील 1 असे 197 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज बुधवारी Rapid Antigen 54 टेस्ट झाल्या आहेत. यात 17 पाँझिटिव्ह आढळले तर rtpcr मध्ये 1 जण पाँझिटिव्ह आहे.
आज 5 जणांनी कोरोनावर मात केली आहे , त्यांना घरी पाठविण्यात आले.