चिंताजनक:शनिवारी ही सोलापूर ग्रामीण भागात179 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; दोन मृत्यू

0
52

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र व विविध गावामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज शनिवारी ग्रामीण भागातील तब्बल 179 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये 117 पुरुष तर 62 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 54 आहे. आज तब्बल 2061 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 1882 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक पुरुष आणि एक महिला यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांनी दिली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील 32 रुग्ण, बार्शी येथील 17 , करमाळा येथील दोन, माढा येथील 22, माळशिरस येथील सहा, मंगळवेढा मधील 37, मोहोळ तालुक्यातील 9, उत्तर सोलापुरातील बारा, पंढरपूर तालुक्यातील सात, सांगोला तालुक्यातील तीन आणि दक्षिण सोलापुरातील 32 असे एकूण 179 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1563 इतकी झाली आहे. यामध्ये 977 पुरुष तर 586 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 43 जणांचा मृत्यू झाला आहे.

यात 32 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1006 आहे .यामध्ये 622 पुरुष 384 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 514 आहे यामध्ये 324 पुरुष तर 190 महिलांचा समावेश होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here