
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील विविध गावात व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रात्री गुरूवारी ग्रामीण भागातील 146 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये 92 पुरुष तर 54 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 71 आहे. आज तब्बल 823 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 677 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांनी दिली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील 422 रुग्ण,
बार्शी येथील 574 ,
करमाळा येथील 58
माढा येथील 87,

माळशिरस येथील 102 बाधित रुग्ण, मंगळवेढा मधील 57, मोहोळ तालुक्यातील 174 ,उत्तर सोलापुरातील 203 जण बाधित आहेत.पंढरपूर तालुक्यातील 236,
सांगोला तालुक्यातील 31 , दक्षिण सोलापुरातील 477 रुग्ण असे एकूण 2421 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज पर्यंत 57 मृत्यू झाले असून एकूण बरे झालेले लोक 733 आहेत तर 1531 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2421 इतकी झाली आहे. यामध्ये 1501 पुरुष तर 920 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे
