सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज गुरूवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 12 पर्यंत एकूण 999 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 873 अहवाल निगेटिव्ह आले असून 126 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 58 पुरुष तर 68 महिलांचा समावेश आहे.

आज 346 प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 39 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.
या भागातील चौघांचा झाला मृत्यू
सोलापुरातील मौलाली चौक परिसरातील 67 वर्षिय पुरुष, रेणुका नगर परिसरातील 40 वर्षिय पुरुष, लक्ष्मी चाळ परिसरातील एकूण 70 वर्षीय महिला आणि 50 वर्षीय अनोळखी निनावी व्यक्ती यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4178 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 337 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1540 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2301 इतकी समाधानकारक आहे.

आज नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये संतोष नगर बाळे एक, नळ बाजार चौक, विद्यानगर उत्तर सदर बझार, लक्ष्मी चौक जुना विडी घरकुल, योगेश्वरनगर देगाव, सिद्धिविनायक रेसिडेन्सी दमाणीनगर, साईनगर होटगी रोड 1, शंकरनगर होटगी रोड, स्वामी विवेकानंद नगर हत्तुरे वस्ती, यशोधरा नगर ओमकार सोसायटी, बसवेश्वर नगर होटगी रोड, किर्लोस्कर कारखान्या जवळ होटगी रोड, शंकर नगर होटगी रोड, मजरेवाडी, जानकीनगर जुळे सोलापूर, कुमठा, कोळी सोसायटी इंदिरा नगर विजापूर रोड,

साठे चाळ बुधवार पेठ, मारुती गल्ली बाळे, हराळय्यानगर, कमलानगर विजापूर रोड, प्रताप नगर विजापूर रोड, दक्षिण कसबा, सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 1, सिव्हिल क्वॉर्टर, शाहीर वस्ती, आयोध्या नगर, जानकी नगर, म्हाडा विजापूर रोड, लक्ष्मीनगर हत्तुरे वस्ती, सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6, जेलरोड नियर काळी मशीद जवळ, आनंद नगर मजरेवाडीइ दोंदे नगर.
सिंधू विहार, सलगरवाडी देगाव रोड, रईस आपार्टमेंट होटगी रोड, दमाणीनगर, सैफुल, कमलेश नगर बार्शी रोड, एकता नगर, अशोक चौक, स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी समर्थ चौक, उत्तर कसबा, विष्णू मिल देगाव नाका, तिरंगा आपारमेंट दमाणीनगर, गिरीजा आपार्टमेंट दमाणीनगर, एनजी मिल चाळ, मारुती गल्ली बाळे, शिवाजी नगर बाळे, जय भिम नगर बाळे, नामदेव सोसायटी बाळे, खडक गल्ली बाळे,

पाटील नगर बाळे, एसआरपी कॅम्प विजापूर रोड, सिद्धेश्वर नगर विजापूर रोड, मंजुषा हौसिंग सोसायटी विकास नगर, आसरा हौसिंग सोसायटी, यशदिप अपार्टमेंट रेल्वेलाईन, रोहिणी नगर भाग नंबर तीन, कुमठा मड्डी वस्ती, कुमठा तांडा, सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 2, नरेंद्र नगर सैफुल,
बहुरुपी नगर विजपुर रोड, सुंदरम नगर, सेटलमेंट फ्री कॉलनी, मौलाली चौक, मार्कंडेय नगर, व्यंकटेश नगर अक्कलकोट रोड, विना रेसिडेन्सी बाळे, कोळी हाउसिंग सोसायटी, गांधी नगर अक्कलकोट रोड, शशिकला नगर नई जिंदगी, विद्या नगर शेळगी या भागात आज नव्याने कोरणा बाधित रुग्ण आढळले आहेत.