1,230 नवे पॉझिटीव्ह, 36 मृत्यू, 587 रुग्ण कोरोनामुक्त! बधितांचा आकडा 23 हजारांवर

0
21

ग्लोबल न्यूज – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 23 हजार 401 झाली आहे. आज 1230 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 587 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 4786 रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 18 हजार 914 नमुन्यांपैकी 1 लाख 93 हजार 457 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 23 हजार 401 जण पॉझिटिव्ह आले आहेत. (प्रयोगशाळा नमुन्यांचे आकडे आय सी एम आर पोर्टलप्रमाणे अद्ययावत करण्यात आले आहेत.)

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राज्यात 2 लाख 48 हजार 301 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 15 हजार 192 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 36 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 868 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 20, सोलापूर शहरात 5, पुण्यात 3, ठाणे शहरात 2, अमरावती जिल्हा, औरंगाबाद शहर, नांदेड शहर, रत्नागिरी व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 23 पुरुष तर 13 महिला आहेत. आज झालेल्या 36 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 17 रुग्ण आहेत तर 16 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षांखालील आहे. या 36 रुग्णांपैकी 27 जणांमध्ये (75 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 14,521 (528)

ठाणे: 125 (2)

ठाणे मनपा: 927 (10)

नवी मुंबई मनपा: 898 (4)

कल्याण डोंबिवली मनपा: 366 (3)

उल्हासनगर मनपा: 30

भिवंडी निजामपूर मनपा: 32 (2)

मीरा भाईंदर मनपा: 214 (2)

पालघर: 37 (2)

वसई विरार मनपा: 249 (10)

रायगड: 123 (1)

पनवेल मनपा: 139 (2)

ठाणे मंडळ एकूण: 17,661 (566)

नाशिक: 60

नाशिक मनपा: 40

मालेगाव मनपा: 595 (34)

अहमदनगर: 54 (3)

अहमदनगर मनपा: 09

धुळे: 9 (3)

धुळे मनपा: 45 (3)

जळगाव: 145 (12)

जळगाव मनपा: 35 (7)

नंदूरबार: 22 (2)

नाशिक मंडळ एकूण: 1015 (64)

पुणे: 166 (5)

पुणे मनपा: 2478 (149)

पिंपरी चिंचवड मनपा: 147 (4)

सोलापूर: 9

सोलापूर मनपा: 287(16)

सातारा: 121 (2)

पुणे मंडळ एकूण: 3206 (176)

कोल्हापूर: 13 (1)

कोल्हापूर मनपा: 6

सांगली: 33

सांगली मिरज कुपवाड मनपा: 4 (1)

सिंधुदुर्ग: 6

रत्नागिरी: 42 (2)

कोल्हापूर मंडळ एकूण: 104 (4)

औरंगाबाद: 93

औरंगाबाद मनपा: 491 (14)

जालना: 14

हिंगोली: 60

परभणी: 1 (1)

परभणी मनपा: 1

औरंगाबाद मंडळ एकूण: 660 (15)

लातूर: 26 (1)

लातूर मनपा: 5

उस्मानाबाद: 3

बीड: 1

नांदेड: 4

नांदेड मनपा: 41 (4)

लातूर मंडळ एकूण: 80 (5)

अकोला: 18 (1)

अकोला मनपा: 144(11)

अमरावती: 5 (2)

अमरावती मनपा: 78 (11)

यवतमाळ: 97

बुलढाणा: 25 (1)

वाशिम: 1

अकोला मंडळ एकूण: 368 (25)

नागपूर: 2

नागपूर मनपा: 257 (2)

वर्धा: 1 (1)

भंडारा: 1

गोंदिया: 1

चंद्रपूर: 1

चंद्रपूर मनपा: 3

गडचिरोली: 0

नागपूर मंडळ एकूण: 266 (3)

इतर राज्ये: 41 (10)

एकूण: 23 हजार 401 (868)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1256 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 12 हजार 27 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 53.71 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.