सोलापूर शहरात शुक्रवारी १२७ पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ 185 जण झाले बरे

0
54

सोलापूर-शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे .अनलॉक सोलापूर मध्ये वाढणारी संसर्गजन्य रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा दर प्रशासनाची आणि सोलापुरातील नागरिकांची चिंता वाढवत आहे त्यामुळे प्रशासनाने 10 दिवसाचा कडक लॉकडाऊन घेतला. त्यातून मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग करण्याचे नियोजन केले आहे. अद्याप तरी मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग होत नाहीत. शुक्रवारी 127 कोरोना बाधित रुग्णांची वाढ शहर परिसरात झाली आहे.

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये शुक्रवारी 1350 कोरोना संदर्भात वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 1223 अहवाल निगेटिव्ह आले असून 127 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 75 पुरुष तर 52 महिलांचा समावेश होतो. आज 336 प्रलंबित अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. शुक्रवारी 185 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.तर 1 महिलेचा मृत्यू झाला आहे. अशी नोंद घेण्यात आल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शहरात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4305 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 338 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1481 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2486 इतकी लक्षणीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here