पंढरपूर:- पंढरपूर शहरामध्ये आज तब्बल 114 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. प्रशासनाने चेस द व्हायरस या मोहिमेअंतर्गत पंढरपूर तालुक्यांमध्ये तब्बल 803 कोरोना रॅपिड एंटीजेन टेस्ट घेतल्या.

यापैकी 114 रुग्ण हे कोरूना पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यामुळे आता पंढरपूर तालुक्याचा कोरोना बाधितांचे आकडा 980 वर पोहोचला आहे.

आज पंढरपूर शहरामध्ये गजानन महाराज मठ, मनिषा नगर, आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आल्या. तर ग्रामीण भागामध्ये भंडीशेगाव, आढीव, उंबरे पागे, करकंब आणि धोंडेवाडी येथे टेस्ट घेण्यात आल्या आहेत.
शंभरच्या पुढे करून आबाधित यांचा पंढरपूर मध्ये आकडा हा सलग दुसऱ्या दिवशी पुढे आलाय.

ही आकडेवारी चिंताजनक असली तरी प्रशासनाने सुरू केलेल्या चेस द व्हायरस मोहिमेअंतर्गत हे कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सुरू केलेली ही मोहीम नक्कीच भविष्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यास मदतीची ठरणार आहे.