बार्शी शहराला विकासकामासाठी दलीतवस्ती ८ कोटी आणि इतर ३ कोटी निधी -दिलीप सोपल यांनी दिली माहिती
बार्शी : आज मंत्रालयात बार्शी नगरपालिका रस्ता दुरवस्था बाबत झालेल्या बैठकीत माझ्या मागणीनुसार पालकमंत्री ना दत्तात्रय भरणे यांनी सुमारे ११ कोटींचा भरघोस निधी जाहीर केला आहे अशी माहिती माजी आमदार दिलीप सोपल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

यावेळी आमदार संजय शिंदे माजी आमदार दीपक साळुंखे जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे , मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील डीपीओ आशिष लोकरे उपस्थित होते.

सोपल यांनी यावेळी शहरात सर्वत्र झालेल्या रस्त्याच्या दुरावस्था वर प्रशासनाची कानउघडणी करत पालकमंत्री यांच्या कडे जास्तीच्या निधीची मागणी केली. यावेळी पालकमंत्री भरणे यांनी माजी मंत्री दिलीप सोपल व बार्शी नगरपालिका विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी मागणी केलेल्या ३.५० कोटीच्या कामाचा अंतर्भाव करीत सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.

यावेळी सोपल यांनी हा निधी दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार मानत या निधी मंजुरी बद्दल धन्यवाद दिले.