11 वर्षांचा हा प्रवास आणि आज 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार जाहीर ;वाचा सविस्तर या गुरुजीविषयी

    0
    25

    11 वर्षांचा हा प्रवास आणि आज जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांमध्ये निवड।

    जगातली सर्वोत्तम 50 शिक्षकांच्या यादीत सोलापूरचे रणजितसिंह डिसले यांचा समावेश।

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    बार्शीच्या या शिक्षकाला 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार

    बार्शी: शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे ग्लोबल टीचर प्राईझ जाहीर झाले असून जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरिता निवड करण्यात आली आहे.

    लंडन येथील वाकी फौंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार मे महिन्यात लंडन येथे होणाऱ्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील.

    रणजितसिंह डिसले, विनिता गर्ग व शुवजीत पायने यांना याकरिता नामांकन मिळाले आहे. असा बहुमान मिळवणारे डिसले गुरुजी एकमेव जिल्हा परिषद शिक्षक ठरले आहेत.

    लेट्स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्त्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका व उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील 50000 मुलांची पीस आर्मी तयार करून परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे.

    तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे.

    सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत असणारे डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात.

    डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत। व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हुन अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात.

    अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील 7 वे शिक्षक ठरले आहेत। मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफीक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे। लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आले आहे.