उजनीवर 100 मि.मी. पाऊस , 11 दरवाजे उघडून 15 हजार क्यु. पाणी सोडले ;भीमा नदी दुथडी भरून वाहणार

0
861

उजनीवर 100 मि.मी. पाऊस , 11 दरवाजे उघडून 15 हजार क्यु. पाणी सोडले ;भीमा नदी दुथडी भरून वाहणार

पंढरपूर – परतीच्या पावसाने भीमा व नीरा खोरे परिसरात दमदार हजेरी लावली आहे. उजनी धरणावर 100 मि.मी. पर्जन्यमान नोंदले गेले आहे. हा प्रकल्प 110 टक्के भरल्याने यातून 15 हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. याच बरोबर वीरमधून नीरेत 13 हजार क्युसेकने पाणी विसर्ग होत असल्याने नीरा व भीमा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहणार आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उजनीवर या पावसाळा हंगामात आजपर्यंत 598 मि.मी. पावसाची नोंद आहे. धरण क्षमतेने भरल्याने 15000 हजार क्युसेकने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 11 दरवाज्यातून हा विसर्ग सुरु आहे.

धरणाची पाणीपातळी 497.325 मी. असून एकूण पाणी साठा 3489.46 दलघमी म्हणेच (123.22 टीएमसी) आहे. उपयुक्त पाणी 1686.65 दलघमी ( 59.56 टीएमसी) आहे . टक्केवारी 111.17 %. उजनीत येणारी दौंडची आवक 6034 क्युसेक आहे.

धरणातून सोडण्यात येणारे पाणी.

1) Sina Madha LIS – 299 cusecs.
2)Dahigaon LIS – 105 Cusecs.
3) Tunnel – 1000 Cusecs.
4) Main Canal – 2600 Cusecs.
5) Power House – 1600 Cusecs.6) Spillway – 15000 Cusecs.
नदीत एकूण —– 16600 क्युसेक.

दरम्यान नीरा नदी परिसरात ही पावसाची हजेरी आहे तेथील धरणं भरल्याने वीरमधून पाणी सोडले जात आहे. या पाण्यामुळे नीरा व संगमच्या पुढे भीमा दुथडी भरून वाहणार आहे. नदीकाठी सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

पाऊस (7/9/20)
पुणे पाटबंधारे विभाग पुणे
नीरा डावा कालवा कंसात जूनपासूनचा एकूण पाऊस

भाटघर. 11. (881) मि.मी.
निरादेवघर. 52. (1864)
वीर. 41. (489)
गुंजवणी. 09. (1934)
पिंपरा. 45. (497)
वडगाव. 60 (510)
मा.वस्ती. 87. (499)
पणदरे.बं 80. (499)
माळेगाव कॉ. 86 . (478)
बारामती. 105. (458)
सनसर. 133. (493)
अंथुर्णे. 55. (379)
निमगाव. 49. (569)
बावडा. (320)
नाझरे. 48. (446) मि.मी.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here