बार्शीत बंद घराचे कुलूप तोडुन १ लाख रोख व सोन्याचे गंठणची चोरी
बार्शी प्रतिनिधी :
बार्शीत लक्ष्मीनगर येथे बंद घराचे कुलुप कोयंडा तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाट तोडून रोख १ लाख रुपये सुमारे अडीच तोळे सोन्याचे गंठन चोरुन नेल्याची घटना घडली. फिर्यादी सुरज सुनिल डाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुध्द शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.


अधिक माहीती की फिर्यादी डाके याचे आजी मयत झाल्याने घराला कुलुप लावुन ते परांडा येथे दि.१४ फेब्रुवारी रोजी १ वा. गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.१५ रोजी ११ वा. घरी आले असता घराचे मुख्य दरवाज्याचे लावलेले कुलुप कोयंडा तुटलेला दिसला.

घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तर लोखंडी कपाट तोडुन ड्राव्हरमध्ये ठेवलेले २ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे गंठण एक लाख रुपये रोख अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले. बाबत अधिक तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.