सोलापूर शहरात सोमवारी ही सापडले 33 कोरोना रुग्ण; तब्बल आठ जणांचा मृत्यू

0
278

सोलापूर शहरात सोमवारी ही सापडले 33 कोरोना रुग्ण; तब्बल आठ जणांचा मृत्यू

ग्लोबल न्यूज। सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आज सोमवारी आणखी 33 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. त्यामुळे सोलापूर शहरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ हजार २२१ वर पोहचली आहे. आज आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळीची संख्या ११५ वर गेली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज सोमवारी एकूण २२५ जणांचा अहवाल प्राप्त झाले.त्यापैकी १९२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर ३३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये पुरुष २० आणि १३ महिला रुग्णांचा समावेश आहे.आज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या ५५ आहे. तर आतापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या ६९४ आहे.

शहरातील या भागात नव्याने रुग्ण –

दाराशा हॉस्पिटल , देगाव , जोडभावी हॉस्पिटल , सिव्हिल हॉस्पिटल , पाटील वस्ती , विनायक नगर , महादेव नगर , एमआयडीसी दाजी पेठ , साई अंगन , भवानी पेठ , विडी घरकुल , आनंदनगर , ब्रह्मनाथ नगर , कुमठा नाका , जुना विडी घरकुल , न्यू बुधवार पेठ , सिद्धेश्वर पेठ , गुरुवार पेठ गौतम चौक , मोदीखाना , नरसिंह नगर , बॉम्बे पार्क जुळे सोलापूर , भूषण नगर उत्तर कसबा भागात आढळले आहेत.

आज कोरोनाबळी झालेले आठ रुग्ण मृत्यू पावलेले रूग्ण

रेल्वे लाईन परिसरातील ७५ वर्षाचे पुरुष . नई जिंदगी परिसरातील ६७ वर्षाचे पुरूष .. भवानी पेठ ढोर गल्ली परिसरातील ८४ वर्षाचे पुरूष . शुक्रवार पेठ परिसरातील ७७ वर्षाचे पुरुष राजस्व नगर येथील ४ ९ वर्षाचे पुरुष . , भारत माता नगर मजरेवाडी येथील ७० वर्षाची महिला , बुधवार पेठेतील ७ ९ वर्षाचे महिला आणि पाच्छा पेठेतील ५० वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे.