ग्लोबल न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1811 झाली आहे .तर मृतांची संख्या 154 इतकी झाली आहे.

सोलापूर शहरातील आज 112 अहवाल प्राप्त झाले .यात 94 निगेटिव्ह तर 18 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आज 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील मृतांची संख्या यामुळे 143 झाली आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर शहरात आत्तापर्यंत 872 जण कोरोना मुक्त झाले आहेत तर 657 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
आज जे रुग्ण मृत पावले, त्यात मुरारजी पेठ 29 वर्षे पुरुष.
अमृत नगर विजापूर रोड 85 वर्षीय पुरुष भवानी पेठ 56 वर्षे पुरुष अशोक चौक 46 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत सोलापूर शहरात 1672 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात ही संख्या 139 इतकी आहे. आजवर शहरात 143 मृत आहेत तर ग्रामीण भागात 11 मृत आहेत.