ग्लोबल न्यूज: सोलापूर ग्रामीण मधील कोरोना बाधितांची संख्या 149 इतकी झाली आहे . 91 पुरुष आणि 58 महिलांचा समावेश आहे तर आतापर्यंत 11 जणांचा ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज सोलापूर ग्रामीण मध्ये 12 अहवाल प्राप्त झाले ,त्यात 11 निगेटिव्ह तर 1 पॉझिटिव्ह अहवाल आहे. आज एकही मृत्त नाही.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सध्या सोलापूर ग्रामीण मधील 69 जण कोरोना मुक्त झाले आहेत तर 69 जणांवर उपचार सुरू आहेत.
सोलापूर ग्रामीण हद्दीत सर्वाधिक रुग्ण दक्षिण सोलापूर मधील 68 तर अक्कलकोट आणि बार्शी मध्ये प्रत्येकी 22 जण आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात 11, मोहोळमध्ये 5, पंढरपुरात 7,सांगोला 3 ,माढा7 माळशिरस 4 असे रुग्ण आहेत तर करमाळा आणि मंगळवेढा येथे अद्याप एकही रुग्ण मिळून आलेला नाही.
