सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात बुधवारी 128 जण कोरोना पॉझिटिव्ह ; 2 जणांचा मृत्यू

0
72

आज बुधवारी दि.16 डिसेंबर रोजी ग्रामीण भागातील 128 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 84 पुरुष तर 44 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 101 आहे. यामध्ये पुरुष 63 तर 38 महिलांचा समावेश होतो . आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 3192 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3064 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 37 हजार 199 इतकी झाली आहे. यामध्ये 23051 पुरुष तर 14148 महिला आहेत.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1094 जणांचा मृत्यू झाला आहे यात 788 पुरुष तर 306 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1020 आहे .यामध्ये 815 पुरुष तर 205 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 35 हजार 085 यामध्ये 21448 पुरुष तर 13637 महिलांचा समावेश होतो.

या भागातील दोघांचा मृत्यू…

सोलापूर जिल्हा परिसरातील कान्हापुरी, ता. पंढरपूर येथील 60 वर्षांची स्त्री, दहिगाव ता. माळशिरस येथील 63 वर्षांचे पुरुष असून यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 4

बार्शी –नागरी 14 तर ग्रामीण 4

करमाळा –नागरी 4 ग्रामीण 1

माढा – नागरी 1 तर ग्रामीण 8

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 23

मंगळवेढा – नागरी 6 ग्रामीण 8

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 5

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2

पंढरपूर – नागरी 2 ग्रामीण 32

सांगोला – नागरी 9 ग्रामीण 4

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

आजच्या नोंदी नुसार नागरी -36 तर ग्रामीण भागात 92 असे एकूण 128 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here