सोलापूर: गुरुवारी सकाळी तब्बल 42 जण कोरोना पॉझिटिव्ह ,एकूण आकडा झाला 709

0
180

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. बुधवारी सायंकाळी 5 ते आज गुरुवारी सकाळी 8 या 15 तासांमध्ये तब्बल 42 नवीन रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांमध्ये 17 पुरुष व 25 महिलांचा समावेश आहे. एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यूही आज सकाळी आठ वाजेपर्यंत झाला आहे.

कोरोनामुळे सोलापुरातील मृत पावलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 67 झाली आहे. सोलापुरातील सहा हजार 289 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 5,580 आले आहेत. 709 पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या 311 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही संख्या कधी आटोक्यात येणार? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. 12 एप्रिल पर्यंत कोरोना मुक्त असलेले सोलापूर अचानक कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. सतत वाढत चाललेल्या रुग्णसंख्या संख्येमुळे सोलापूरमध्ये संभ्रमाचे व भितीचे वातावरण पसरले आहे.

दि.28/05/20 सकाळी 8
आजचे तपासणी अहवाल – 129
पॉझिटिव्ह- 42
(पु. 17 * स्त्रि- 25 )
निगेटिव्ह- 87
आजची मृत संख्या- 1 पु
एकुण पॉझिटिव्ह- 709
एकुण निगेटिव्ह – 5580
एकुण चाचणी- 6289
एकुण मृत्यू- 67
एकुण बरे रूग्ण- 311