सोलापूरात शनिवारी कोरोना मृत्यूचा कहर तब्बल 8 जणांचा मृत्यू ,तर 14 कोरोनाग्रस्तांची भर

0
124

सोलापूरात शनिवारी कोरोना मृत्यूचा कहर तब्बल 8 जणांचा मृत्यू तर 14 कोरोनाग्रस्तांची भर

शनिवारी तब्बल 8 जणांचा मृत्यू , एकूण रुग्ण संख्या झाली 865

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर- सोलापूरातील पॉझिटिव्ह कोरोना बाधितांची संख्या तीन दिवसानंतर आज थोडी कमी झाली. आज एका दिवसात 230 अहवाल प्राप्त झाले यात 216 निगेटिव्ह तर 14 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात 9 पुरूष, 5 महिलांचा समावेश आहे. आज मृतांची संख्या मात्र 8 इतकी असून एकूण मृतांची संख्या 83 झाली आहे.

आत्तापर्यंत सोलापूरात 7707 जणांची कोरोना चाचणी झाली असून 7036 अहवाल प्राप्त झाले आहेत. 671 अहवाल प्रलंबित आहेत. आत्तापर्यंत निगेटिव्ह 6171 अहवाल आले तर पॉझिटिव्ह अहवाल 865 झाले आहेत. आज रूग्णालयातून 29 जणांना घरी सोडण्यात आलं. यामुळं बरे झालेल्या रूग्णांची संख्या 380 झाली आहे तर 402 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

आज मृत झालेल्या व्यक्ती –

गांधी नगर अ.कोट रोड 45 वर्षीय पुरूष.
नरसिंह नगर मोदी 61 वर्षीय महिला.
भवानी पेठ परिसर 72 वर्षीय पुरूष.
अवंतीनगर परिसर 69 वर्षीय महिला.
जुना विडी घरकुल परिसर 67 वर्षीय पुरूष. बाळीवेस परिसर 62 वर्षीय महिला.
उत्तर कसबा परिसर 61 वर्षीय पुरूष.
वेणुगोपाल नगर 41 वर्षीय पुरूष.

आज जे रूग्ण मिळाले ते विभाग –

उत्तर कसबा 2 पुरूष.
मरीआई चौक दमाणी नगर 1 महिला.
सरवदे नगर 1 पुरूष. गांधी नगर अ.कोट रोड 1 पुरूष.
बुधवार पेठ 1 महिला. जुना विडी घरकुल 2 पुरूष, 1 महिला.
आंध्र तालीम लष्कर 1 पुरूष.
मोदी 1 महिला.
कुमठा नाका 1 महिला. अंबिका नगर 1 पुरूष. निलमनगर 1 पुरूष.