सोलापूरात रविवारी सकाळी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

0
139

सोलापूर-सोलापूरात शनिवारी कोरोना बाधितांची संख्या 565 इतकी झाली होती त्यात रविवारी सकाळी 5 पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ होऊन हा आकडा 570 वर पोहचला. तर आत्तापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 249 झाली आहे. मृतांची संख्या आत्तापर्यंत 46 इतकी झाली आहे.

आत्तापर्यंत 5500 व्यक्तींची कोरोना चाचणी झाली असून यातील 5423 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 4930 निगेटिव्ह तर 570 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज सकाळी दिवसात 77 अहवाल आले यात 72 निगेटिव्ह तर 5 पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये 4 पुरूष आणि 1 महिलांचा समावेश आहे.

24/05/20,
सकाळी 8 वाजता
आजचे तपासणी अहवाल -77
पॉझिटिव्ह- 5
(पुरुष- 4 * स्त्री- 1)
निगेटिव्ह- 72
आजची मृत संख्या- 0
एकूण पॉझिटिव्ह- 570
एकूण निगेटिव्ह – 4930
एकूण चाचणी- 5500
एकूण मृत्यू-46
एकूण बरे रूग्ण- 249