सोलापूरात बुधवारी सकाळी ही आढळले 40 रुग्ण, एकूण आकडा 1080 वर

0
25

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढ काही केल्या थांबण्यास तयार नाही. दररोज आकडा हा वाढत असल्याने हजारी पार केली आहे. बुधावरी नसोलापूर शहर व जिल्ह्यात एका रात्रीमध्ये तब्बल 40 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 36 पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाना बाधित व्यक्तींची संख्या आता 1080 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृत व्यक्तींची संख्या 90 झाली आहे. सोलापुरात आतापर्यंत 7860 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6780 निगेटिव्ह आले आहेत. 1080 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 447 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज सकाळी आठ वाजेपर्यंत चाचणीचे 156 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 116 निगेटिव्ह तर 40 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

सोलापूर कोरोना आजचा अहवाल
दि.3/06/20
सकाळी 8
आजचे तपासणी अहवाल – 156
पॉझिटिव्ह- 40 (पु. 36 * स्त्रि-4 )
निगेटिव्ह- 116
आजची मृत संख्या- 0
एकुण पॉझिटिव्ह- 1080
एकुण निगेटिव्ह – 6780
एकुण चाचणी- 7860
एकुण मृत्यू- 90
एकुण बरे रूग्ण- 447