सोलापूरात कोरोना रुग्णसंख्या झाली 456 ; मंगळवारी 21 ची वाढ

0
127

सोलापूरात कोरोना रुग्णसंख्या झाली 456 ; सोमवारी 21 ची वाढ

सोलापूर-(दि.19) आज रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 443 वरून 456 इतकी झाली आहे. आज 194 अहवाल आले यात 173 निगेटिव्ह तर 21 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आत्तापर्यंत एकूण 4773 जणांची चाचणी घेण्यात यातील 4612 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 4156 निगेटिव्ह तर 456 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. आजून 131 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. आज एक जणाचा मृत्यू कोरोनामुळं झाला असून मृतांची संख्या आता 30 झाली आहे. तर आत्तापर्यंत बरे झाल्यानं 168 जणांना घरी सोडण्यात आलं आहे.

सोमवारी ज्या व्यक्तीची मृत म्हणून नोंद झाली आहे ती बुधवारपेठ परिसरातील 65 वर्षीय पुरूष असून 15 मे रोजी सारीचा त्रास होवू लागल्यानं उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दिनांक 18 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. अहवाल आज आला.

आज जे 21 रूग्ण मिळाले ते पुढीलप्रमाणे

कुमारस्वामीनगर 1 पुरूष.
शास्त्रीनगर 1 पुरूष.

भैय्या चौक 1 पुरूष

तेलंगी पाच्छा पेठ 1 पुरूष.
लोटस अपार्टमेंट गीता नगर 1 महिला.
पाच्छा पेठ 1 महिला.

लक्ष्मी चौक जुना विडी घरकुल 1 पुरूष.

कोनापूरे चाळ 1 पुरूष.

म्हेत्रे नगर 1 महिला.

सदिच्छा नगर विजापूर रोड 1 पु रूष.
कुमठा नाका 1 पुरूष.

दत्त नगर 1 पुरूष.

दाजी पेठ 1 पुरूष.

बुधवार पेठ 2 महिला.

संजय नगर 1 महिला.

रामवाडी 1 महिला.

संजयगांधी नगर रामवाडी 1 पुरूष.

अरविंद धाम पोलीस वसाहत 1 महिला.

पाचेगांव ता. सांगोला 1 पुरूष.

तळे हिप्परगा दक्षिण सोलापूर 1 महिला.

सध्या रूग्णालयामध्ये 258 जणांवर उपचार सुरू आहेत. यात 135 पुरूष तर 123 महिलांचा समावेश आहे. मृत 30 मध्ये 18 पुरूष तर 12 महिलांचा समावेश आहे.

शासनाचे रेड झोन आणि संचार बंदीबाबत निर्देश प्रसिद्ध .
सोलापूर शहर महापालिका कार्यक्षेत्र रेडझोन मध्ये. सोलापूर शहर पोलीस पोलीस आयुक्तालयाने संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा तसेच गरज असलेल्यांना पास दिले आहेत .

सध्याचा लॉक डाउन 31 मे पर्यंत वाढवण्यात आल्याने हे पास 31 मे पर्यंत ग्राह्य धरले जातील असं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.