सोलापूरात कोरोनाचे आजही 22 रूग्ण वाढले; बधितांचा आकडा झाला 330

0
26

सोलापूरात कोरोनाचे आजही 22 रूग्ण वाढले_

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आज 22 ने वाढून 330 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 1 नं वाढून 22 झाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज एका दिवसात 121 जणांचे अहवाल प्राप्त झाले यात 99 निगेटिव्ह तर 22 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 8 पुरूष आणि 14 महिलांचा समावेश आहे. एक महिला मृत पावली आहे.

आत्तापर्यंत एकूण 3713 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. यातील 3481 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 3151 निगेटिव्ह तर 330 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आज रूग्णालयातून बरे होवून गेलेल्यांची संख्या 22 इतकी आहे. तर केगांव क्वारंटाईन सेंटरमधून 88 जणांना सोडण्यात आले.

आज जे 22 रूग्ण वाढले आहेत यात निलमनगर एमआयडीसी रोड येथील 2 महिला,

कोनापूरे चाळ रेल्वे लाईन्स येथील 1 महिला.

कुमठा नाका परिसर 1 पुरूष,

नई जिंदगी (मूळगांव सूलतानपूर उस्मानाबाद) 1 महिला,

नवनाथ नगर एमआयडीसी 2 पुरूष, 1 महिला,

अशोक चौक 3 पुरूष, 4 महिला.

न्यू पाच्छा पेठ 2 पुरूष, 4 महिला.

लष्कर 1 महिला यांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रूग्णांत 181 पुरूष तर 149 महिलांचा समावेश आहे. तर मृत 22 मध्ये 11 पुरूष, 11 महिलांचा समावेश आहे.

आता पर्यंत एकूण 106 जणांना बरं झाल्यानं घरी सोडण्यात आलं आहे.

आज जी महिला मृत पावली ती 65 वर्षिय सूलतानपूर उस्मानाबाद येथील आहे. नई जिंदगीत नातेवाईकांकडे ती 18 मार्चला आली होती. 12 मे रोजी त्रास होवू लागल्यानं सिव्हीलमध्ये उपचारासाठी आली. सायंकाळी तिचा मृत्यू झाला.