सोलापूरात आज दोन बाळं आई सह कोरोनामुक्त; सोलापूर शहरात 28 तर ग्रामीण भागात 7 नवीन रुग्ण
सोलापूर- सोलापूर शहरात आज 28 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून एकूण संख्या 1188 झाली आहे. तर सोलापूर ग्रामीणमध्ये आज 7 रूग्णांची भर पडली असून एकूण संख्या 80 झाली आहे.

सोलापूर शहरात आज 191 अहवाल प्राप्त झाले यात 163 निगेटिव्ह तर 28 पॉझिटिव्ह रूग्ण मिळाले यात 17 पुरूष आणि 11 महिलांचा समावेश आहे. आज 6 जण मृत पावल्याची नोंद आहे तर बरं झाल्यानं 8 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. शहरात सद्यस्थितीत 649 रूग्ण बरे झाले असून 432 जणांवर उपचार सुरू
आहेत. एकूण मृतांची संख्या 107 इतकी झाली आहे.

सोलापूर ग्रामीण हद्दीत कुर्डूवाडी रेल्वे विभागातील 6 जवानांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर वळसंग
येथे 1 रूग्ण मिळाला आहे. आज दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण हद्दीत 80 रूग्ण पॉझिटिव्ह असून 6 जण बरे झाले आहेत तर 6 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. शहर आणि जिल्ह्यातील मिळुन पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1268 इतकी झाली असून मृतांची संख्या 113 झाली आहे.

सोलापूर मार्कंडेय रूग्णालयातून नगरसेविकेसह 10 जण कोरोनामुक्त होवून परतले तर सिव्हील हॉस्पिटलमधून 13 दिवसाची दोन बाळं त्यांच्या आईसह कोरोनामुक्त होवून घरी परतले ही सुखद
बातमी आहे.