सोलापुरात कोरोना बधितांची वाढ सुरूच आज 14 ची भर आकडा झाला 196 ,दोन मृत्यू

0
188

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 14 ने वाढून 196 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी सायंकाळी दिली. आज एकाच दिवशी बाधितांची संख्या 14 ने वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

आज शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिला 25 एप्रिल रोजी अॅडमिट केले होते. 26 एप्रिल रोजी पॉझिटिव आला होता सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान पहाटे तिचा मृत्यू आहे. दुसरा मृत्यू रंगभवान परिसरातील 76 वर्षाचा पुरुष असून 5 मे रोजी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सात मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव आला होता. उपचारादरम्यान आज पहाटे दोन वाजता निधन झाले आतापर्यंत एकूण बळी ची संख्या 13 च्या घरात गेली आहे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,आज एका दिवसात सोलापुरात 170 चाचणी अहवाल आले यात अहवाल 156 निगेटिव्ह तर 14 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 8 पुरुष तर 6 स्त्री असून 1 स्त्रीचा मृत्यू झाला आहे.

आज आढळून आलेले नवे रुग्ण

गवळी वस्ती जुना कुंभारी रोड एक पुरुष, शास्त्रीनगर एक पुरुष हुडको नंबर तीन कुमठा नाका एक पुरुष, सिविल हॉस्पिटल च्या पाठीमागे समर्थनगर येथील एक स्त्री ,
न्यू पाच्छा पेठ गीता नगर येथील एक पुरुष भारतरत्न इंदिरा नगर येथिल एक स्त्री ,संजय नगर कुमठा नाका येथील एक पुरुष, रविवार पेठेतील एक स्त्री न्यू पाच्छा पेठ येथील दोन पुरुष आणि एक स्त्री मोदीखाना परिसरातील एक स्त्री सदर बाजार येथील एक स्त्री सिद्धेश्वर पेठ येथील एक पुरुष असे एकूण 14 नव्याने रुग्ण आढळले आहेत.

आज दोन व्यक्ती मयत झाल्या असून पहिली व्यक्ती शास्त्रीनगर परिसरातील 56 वर्षे महिला आहे. 25 एप्रिल रोजी सकाळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते ,तर 26 एप्रिल रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचे उपचारादरम्यान आज आठ मे रोजी पहाटे निधन झाले.

तर मयत झालेली दुसरी व्यक्ती रंगभवन परिसरातील 76 वर्षाची पुरुष आहे .पाच मे रोजी त्यांना सकाळीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते सात मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला उपचारादरम्यान आज पहाटे दोन वाजता त्यांचे निधन झाले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur