सोलापुरात कोरोनाचा आकडा 39 वर, संचारबंदी ची मुदत वाढवली, बँका ही बंद राहणार ;जिल्हाधिकाऱ्यांनी काढले सुधारित आदेश

0
124

सोलापुरात आज सहा रुग्णांची वाढ झाली असून आज 39 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. काल त्यांची संख्या 33 होती .त्यात वाढ होऊन आज 39 झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

आज चार पुरुष आणि दोन महिला यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या मध्ये 2 व्यक्ती बापूजी नगर परिसरातील आहेत, 1 व्यक्ती शास्त्रीनगर परिसरातील आहे. 1 लष्कर सदर बाजार परिसरातील, एक व्यक्ती  इंदिरानगर परिसरातील .तर  शेवटची व्यक्ती कुर्बान हुसेन नगर परिसरातील आहे

जिल्हाधिकारी यानी दिलेल्या माहितीनुसार
सोलापूर कोरोना सद्यस्थिती दि. 23/04/2020 सायंकाळी पर्यन्त

एकूण होम क्वारंटाईन : 2534
14 दिवसाचा कालावधी पूर्ण : 1327
अजूनही होम क्वॉरंटाईनमध्ये : 1207

इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये : 1379
14 दिवसाचा कालावधी पूर्ण :852
अजूनही इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये : 527

आयसोलेशन कक्षात : 1029
एकूण स्वॅब टेस्ट : 805
अहवाल निगेटीव्ह : 638
अहवाल पॉझीटीव्ह : 39
मृत : 03

सोलापुरातील हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे .त्यामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येत्या चार दिवसात होम टू होम सर्वेक्षण कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिनांक 24 एप्रिल ते 27 एप्रिल पर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश जाहीर केलेले आहेत.  त्या पार्श्वभूमीवर बँकांनाही त्यांचे कार्यालयीन कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती  जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी सांगितले की…

आज, 23 एप्रिल 2020 च्या सुधारित वाढीव संचारबंदीच्या आदेशाप्रमाणे व जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चांमधून सोलापूर शहरातील सर्व बँका दिनांक 24 एप्रिल 2020 व 27 एप्रिल 2020 या दिवशी संचारबंदी आदेशाप्रमाणे बंद राहतील.

सर्व बँकांना शनिवारी व रविवारी बँकिंग नियमाप्रमाणे सुट्टी आहे. तरी सोलापूर शहरांमधील सर्व बँका या कालावधीमध्ये बंद राहतील, याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी.

संतोष सोनवणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया सोलापूर