सोलापुरात आज 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; एकूण आकडा झाला 992 ,49 रुग्ण झाले बरे

0
285

सोलापुरातील कोरोना बाधिताची संख्या आता 992 पर्यंत पोहोचली आहे.

ग्लोबल न्यूज: सोलापूरमध्ये आज दिवसभरात 160 अहवाल प्राप्त झाले. यात 117 निगेटिव्ह तर 43 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 25 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज एक महिला मृत्यू पावल्याची नोंद आहे .आतापर्यंत सोलापुरात 8305 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी 7471 अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 834 अहवाल प्रलंबित आहेत. यात 6479 निगेटिव्ह तर 992 पॉझिटिव्ह आले आहेत. आज बरं झाल्याने 49 जणांना घरी सोडण्यात आलं.

आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 992 असून एकूण मृतांची संख्या 89 आहे. सध्या 460 जणांवर उपचार सुरू असून 443 जणांना बरं झाल्याने घरी सोडण्यात आलं आहे. आज जी महिला मृत पावली ती 65 वर्षीय , निराळे वस्ती भागातील आहे.

आज जे नवीन रुग्ण मिळून आले त्यांची माहिती पुढील प्रमाणे .

कुमठा नाका 1 पुरुष
शिवाजी नगर बाळे 1 पुरुष
निराळे वस्ती 1 महिला एमआयडीसी रोड 1 महिला.
दमानी नगर 1 महिला
होडगी रोड मजरेवाडी 2 पुरुष मिलिंद नगर बुधवार पेठ 1 पुरुष. दत्त चौक 1 पुरुष.
बॉम्बे पार्क 1 पुरुष.

वसंतनगर पोलिस लाईन 1 पुरुष 1 महिला.
लक्ष्मी पेठ 1 पुरुष.
उत्तर कसबा माळे गल्ली 1 पुरुष 2 महिला.
दक्षिण कसबा 1 पुरुष.
मौलाली चौक 1 पुरुष.
दाजी पेठ 1 पुरुष.
भवानीपेठ 1 पुरुष 2 महिला. सलगर वस्ती 2 पुरुष.
समाधान नगर 1 महिला .

अक्कलकोट रोड 1 महिला.
मराठा वस्ती 1 महिला.
बुधवारपेठ 1 पुरुष 5 महिला .
गुरूनानक चौक 3 पुरुष.
कर्णिक नगर 1 पुरुष.
रविवार पेठ 2.

पुरुष विडी घरकुल 1 महिला.
फॉरेस्ट न्यू तिर्हेगाव 1 पुरुष .
हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर 1 महिला .
मौजे बारडी तालुका पंढरपूर 1 पुरुष


मृत रुग्णाचा कोरोना अहवाल येण्यापूर्वीच. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन नियम मोडणे, कामात हलगर्जीपणा या आरोपावरून जिल्हा प्रशासनाने सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur