सोलापुरात आज 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर सात जणांचा मृत्यू

0
146

सोलापुरात आज कोरोना वर उपचार घेणार्‍यांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या आज ठरली सरशी

सोलापूर-सोलापूर शहरातील बर्‍या झालेल्या रूग्णांची संख्या 277 वर पोहोचली असून अद्यापही 273 जणांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 196 अहवाल प्राप्त झाले यात 171 निगेटिव्ह तर 25 पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये 12 पुरूष आणि 13 महिलांचा समावेश आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज एकूण मृतांची संख्या 7 असून यात 4 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे.

अत्तापर्यंत 5933 स्वॅब घेण्यात आले. यात 5739 अहवाल प्राप्त पैकी 5131 निगेटिव्ह तर 608 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. मृतांची एकूण संख्या 58 झाली असून यात 36 पुरूष आणि 22 महिलांचा समावेश आहे.

आज ज्या व्यक्ती मृत पावल्या त्या दमाणीनगर 57वर्षीय महिला, गंगानगर देगांवनाका 58 वर्षीय महिला.
रविवार पेठ 60 वर्षीय पुरूष.
आंबेडकर नगर 58 वर्षीय पुरूष.
रविवार पेठ 68 वर्षीय महिला.
निलम नगर 58 वर्षीय पुरूष.
हिरज तालुका उत्तर सोलापूर 65 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.

आज जे पॉझिटिव्ह रूग्ण मिळाले ते विभाग असे –
कुमठा नाका 1 पुरूष. बुधवार पेठ 1 महिला. न्यू बुधवार पेठ 1 पुरूष. शासकिय वैद्यकिय महाविद्यालय क्वार्टर 2 पुरूष, 1 महिला.

भारतरत्न इंदिरानगर 1 पुरूष, 2 महिला. आंबेडकर नगर 1 पुरूष. कर्णिकनगर 1 पुरूष, 1 महिला.
दत्तनगर संयुक्त झोपडपट्टी 1 पुरूष, 1 महिला.
शिवगंगा मंदिर मराठा वस्ती 2 पुरूष, 1 महिला.
मार्कंडेय नगर एमआयडीसी 1 महिला. लष्कर 1 महिला. समाधान नगर अ.कोट रोड 1 पुरूष.
जुना विडी घरकुल 1 महिला.
सारखरपेठ 1 महिला. उत्तर कसबा 1 महिला. भैय्या चौक 1 महिला. हिरज ता. उत्तर सोलापूर 1 पुरूष.