सोलापुरातील धोका वाढतोय: कोरोना बाधितांची संख्या 14 ने वाढून झाली 128

0
153

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 14 ने वाढून 128 झाली आहे.

सोलापुरात आत्तापर्यंत 2080 जणांची कोरोना स्वॅब चाचणी घेण्यात आली .यापैकी 1887 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 1759 निगेटिव्ह ,तर 128 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने ही माहिती ती आज रविवारी संध्याकाळी 7 वाजता प्रसिद्ध केली आहे.
आज एका दिवसात सोलापुरात 213 चाचणी अहवाल आले यात 199 निगेटिव्ह तर 14 पॉझिटिव्ह आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज जे 14 रुग्ण मिळाले यात
नई जिंदगी 1 महिला ,शास्त्रीनगर 2 महिला , फॉरेस्ट 2 पुरुष 1महिला , भारतरत्न इंदिरा नगर 1 पुरुष 1 महिला, बापुजी नगर 3 पुरुष 1महिला,भद्रावती पेठ 1 पुरुष, लष्कर सदर बाजार ,1 महिला .

आत्तापर्यंत केगाव केंद्रातून 109 जणांना तर सिविल हॉस्पिटल मधून उपचारात बरे झालेल्या 19 जणांना घरी पाठवण्यात आलं आहे .आजतागायत सोलापुरात 6 जणाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यु झाला आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी डाग बंगला येथे शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना संसर्ग विषयक माहिती ती चा आढावा घेतला.

राज्य शासनाने मुंबई आणि पुणे वगळता तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता राज्यात एकल अत्यावश्यक सेवा नसलेल्या दुकानांना उघडण्यास सशर्त मान्यता दिली आहे.

यात मद्या च्या दुकानांचा ही समावेश आहे.( एकल म्हणजे ज्या वस्तीत एका ठिकाणी सलग 5 पेक्षा अधिक दुकानं नाहीत अशी दुकानं ) एकल म्हणजे नक्की कोणती दुकान याचा अंतिम अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला आहे.

जिल्ह्यात यंदा 2 लाख 82 हजार 200 हेक्‍टर क्षेत्रावर पीक पेरणीचे नियोजन करण्यात आलं आहे ,अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि बसवराज बिराजदार यांनी दिली आहे.