सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतेयच; आज 21 जणांची भर

0
149

सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय आज 21 जणांची भर

सोलापूर- सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या 385 इतकी झाली आहे. आज एका दिवसात 279 अहवाल आले यात 258 निगेटिव्ह तर 21 पॉझिटिव्ह आहेत. यात 12 पुरूष आणि 9 महिलांचा समावेश आहे. तर आज 2 जण मृत झाले आहेत. यात एक पुरूष 1 महिला यांचा समावेश आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आत्तापर्यंत सोलापूरात कोरोना स्वॅब चाचणी 4282 जणांची झाली. यात 4099 अहवाल प्राप्त झाले. यात 3714 निगेटिव्ह तर 385 पॉझिटिव्ह आहेत. आजून 183 अहवाल प्रलंबित आहेत.

आज जे रूग्ण मिळाले यात
भवानीपेठ 1 पुरूष.

विजापूर नाका झोपडपट्टी क्र.1 1 पुरूष.

गोंधळे वस्ती 2 महिला.

कोनापूरे चाळ 1 पुरूष.

राघवेंद्र नगर विडी घरकुल 1 पुरूष.

भगवान नगर 1 पुरूष.

नरसिंग सोसायटी 1 महिला.

जुना विडी घरकुल 1 पुरूष.

भारतरत्न इंदिरा नगर 1 महिला.

गीतानगर साईबाबा चौक 3 महिला.

शास्त्री नगर 1 पुरूष.

बुधवार पेठ 1 पुरूष, 1 महिला.

निलमनगर 1 महिला.

न्यू बुधवार पेठ 1 पुरूष.

रविवार पेठ 1 पुरूष.

न्यू पाच्छा पेठ (मूळगांव टाकळी पंढरपूर) 1 पुरूष.

शुक्रवार पेठ 1 पुरूष.

आज ज्या दोन व्यक्ती मृत पावल्या आहेत यात 65 वर्षीय महिला मोदीखाना परिसरातील आहे. ती 23 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. 16 मे रोजी मृत पावली.

दुसरी व्यक्ती विजापूर नाका झोपडपट्टी 1 येथील 88 वर्षीय पुरूष असून 14 मे रोजी सिव्हीलमध्ये दाखल झाली होती 15 मे रोजी सायंकाळी मृत पावली.

आत्तापर्यंत रूग्णालयातून बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या 158 आहे. तर एकूण मृतांची संख्या 26 इतकी झाली आहे.