सावधान: बार्शी तालुक्यात रविवारी सकाळी आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले; वाचा सविस्तर-

0
261

सावधान: बार्शी तालुक्यात रविवारी सकाळी आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले; वाचा सविस्तर-

बार्शी : बार्शी तालुक्यातील प्रलंबीत असलेल्या 21 स्वॅब पैकी 7 जणांचे चे रिपोर्ट रविवारी सकाळी आले असून त्यातील  सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  शनिवारचे १४ अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड यांनी याबाबतची माहिती दिली. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोविड-१९ च्या अनुषंगाने येथील आरोग्य प्रशासनाने शनिवारी बाधित रूग्णाच्या संपर्कातील एकूण १४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी सोलापूरला पाठविले. शुक्रवारी पाठविलेले २१ स्वॅब पैकी १४ अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाले ते सर्व १४ अहवाल निगेटिव्ह होते

बार्शी तालुक्यात वैराग, जामगांव आ, पाठोपाठ शेंद्री येथे रूग्ण सापडले. नंतर यात जामगांव आ मध्ये तीन रूग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधित रूग्णांची संख्या ६ वर पोहोचली होती. पैकी जामगांव आ येथील सुरूवातीचा एक रूग्ण मृत असून ५ जणांवर उपचार सुरू आहेत. 

रविवारी सकाळी आलेल्या अहवालात शेंद्री येथील पॉझिटिव्ह असलेल्या रुणाच्या संपर्कातील चार ,जामगाव च्या रुग्णाच्या संपर्कातील  एक तर पुण्याहून रातंजन आलेली व गावातील  क्वारन्टाईन सेंटर मध्ये दाखल असलेली एक मुलगी जिचा स्वॅब खाजगी हॉस्पिटलमधून पाठवला होता. ती ही पॉझिटिव्ह अली आहे.

शुक्रवारी पाठविलेल्या जामगांवच्या ४ पैकी ३, वैराग ६ पैकी ५, खाजगी हॉस्पीटल- १ पैकी १, शेंद्री ७ पैकी २, बार्शी २ पैकी २, उक्कडगांव १ पैकी १ असे २१ पैकी १४ अहवाल प्राप्त झाले असून सर्व १४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारचे ७ अहवाल प्रलंबित होते त्यातील सहा पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आला आहे.  शनिवारी पुन्हा जामगांव आ येथील ७ तर बार्शी शहरातील ७ अशा १४ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले आहेत.  हे सर्व अहवाल प्रलंबित आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur