सामनातून आधी टीका नंतर लोटांगण वाचा राऊतांवर कोणी केली टीका….!

0
263

समनातून आधी टीका नंतर लोटांगण वाचा राऊतांवर कोणी केली टीका….!

सध्या कोरोनाच्या पश्वभूमीवर शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या समानातून खासदार तथा कार्यकारी संपादक संजय राऊत हे नेहमीच विरोधी पक्षावर अर्थात भाजपावर टीका करताना दिसतात मात्र त्यांच्या या टीकेचा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरांनी खरपूस समाचार घेतला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सामनातून राज्यपालांच्या भेटी घेणाऱ्यांना चक्रम वादळ असे राऊतांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रवीण दरेकर यांनी सामनातील प्रतिक्रियेला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची टीका केली आहे. तसेच सामनाची नेहमीच आधी टीका करणं आणि नंतर लोटांगण घेणं अशी भूमिका राहिल्याचाही आरोप दरेकरांकडून लावण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, “सामना’च्या सर्व गोष्टींवर प्रतिक्रिया देणे आवश्यक वाटत नाही. त्यांची भूमिका नेहमीच टीका करणं आणि नंतर लोटांगण घेणं अशी राहिली आहे. ते पंतप्रधानांवर आधी टीका करतात आणि नंतर कौतुक करतात.

त्यामुळे सामनातील प्रतिक्रिया गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सामना कोण वाचणार असा प्रश्‍न असल्यानेच अशी टीका केली जात आहे. राज्यपाल हे कुलपती असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि गुणवत्ता टिकली पाहिजे हीच राज्यपालांची भूमिका आहे.” असं यावेळी दरेकरांनी बोलून दाखविले होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur