साखरपुड्यात उरकले लग्न, लग्नाच्या खर्चाचे पैसे दिले कोरोना ग्रस्तांसाठी

  0
  31

  माजी आमदार केशवराव आंधळे यांचे कनिष्ठ बंधु शंकरराव आंधळे यांचे चिरंजीव मयुर व शिरुर कासार येथील त्र्यंबकराव खेडकर यांची कन्या अमृता यांचा रविवारी साखरपुडा होता. दुपारी 12.30 वाजता पाहुणे मंडळी मंगल कार्यालयात जमा झाली.

  साखरपुडाही पार पडला.परंतु दोन्ही परिवारातील सदस्यांची बैठक झाली व बैठकीत कोरोना व्यवस्थापनासाठी एक लाख रुपयाचा निधी देऊन आजच विवाह करायचा असा निर्णय झाला व तो माजी आमदार केशवराव आंधळे यांनी सर्वासमक्ष बोलुन दाखवला. या निर्णयाचे कुटुंबीयांनी व साखरपुड्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींनी व मित्र परिवाराने टाळ्या वाजवुन स्वागत केले.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  देशांतर्गत कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढत आहे.त्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता.त्यावर तात्काळ नियंत्रण करणे तसेच कोरोना विषाणूची वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. भविष्यात आपल्या जिल्ह्यात व संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

  कोरोनवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र आपलाही त्या आपत्ती व्यावस्थापनात हातभार आसावा म्हणुन आंधळे व खेडकर परिवाराने एक मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या साखरपुडा कार्यक्रमानंतर लगेच चि.मयुर व चि.सौ.का.आमृता या नवदाम्पत्याचा विवाहसोहळा पार पडेल. सामाजिक बांधिलकी जपत लग्नासाठी होणार खर्च टाळून हेच पैसे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला देण्याचं ठरलं आहे.

  उद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे एक लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे. असे आंधळे यांनी सांगितले. त्यानंतर मोठा गाजावाजा न करता साध्या पद्धतीने,मोठ्या खर्चाला फाटा देत मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थीतीत विवाह सोहळा पार पडल्यामुळे समाजात तालुक्यात,जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. .या दोन्ही परिवाराने लग्नाच्या खर्चाचे एक लाख रुपये कोरोना आपत्ती व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले आहेत.