सर्वात वयस्कर माजी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन
मुंबई – प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

रायजी यांचे जावई सुदर्शन नानावटी यांनी रायजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याचे सांगितले आहे.

दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यंदाच्या २६ जानेवारीलाच त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती.
BCCI ने त्यांच्या मृत्यूची पुष्टी करत ट्विटर वर माहिती दिली आहे.