सरकारच्या लॉटरी ला समांतर यंत्रणा तयार करणारे मटका किंग रतन खत्री यांचे निधन

0
175

मुंबई : आकडा प्रचलीत करणारे मटकाकिंग रतन खत्री यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. मुंबईत गँगवॉर ज्या काळात मोठ्याप्रमाणात उफाळला, अशा काळात त्यांनी सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेऊन मटका कसा चालवला जाऊ शकतो, हे दाखवून दिले होते.

रतन खत्री मुंबई सेंट्रलमधील नवजीवन सोसायटीत आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. 1960 च्या दशकात या क्षेत्रात आपलं बस्तान बसवण्यासाठी ते कल्याण भगत यांच्याकडे काम करत होते. मटका, लॉटरी हा आकड्यांचा खेळ म्हणून लोकप्रिय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मटका मुंबईत लोकप्रिय होता. यामध्ये न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजमधून कापसाचे दर उघडणे व बंद करणे यावर पैज लावण्यात आली. शेअर मार्केट प्रमाणे हा प्रकार चालायचा.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

1960 च्या दशकात मटका मुंबईच्या सर्व वर्गात लोकप्रिय होता. रतन खत्री भगतला मॅनेजर म्हणून रुजू झाले होते. 1964 मध्ये खत्री भगतपासून वेगळे झाले आणि त्यांनी स्वत: चा ‘रतन मटका’ बनवला. मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढणे इतके प्रसिद्ध झाले की जुगाराची उलाढाल दररोज 1 कोटी रुपयांना गेली. त्या काळातील कामगार वर्ग मोठ्याप्रमाणात रतन मटकामध्ये आकडा घेण्यासाठी यायचे. त्याचे नेटवर्क अगदी ठाण्यापर्यंत पसरले होते.

रतन खत्री हे 1960 मध्ये कल्याण भगत यांच्या सोबत मटका व्यवसायात उतरले. त्यानंतर 1964 मध्ये त्यांनी भगत यांच्यापासून दूर होत या व्यवसायात आपली वेगळी वाट धरली. मटका व्यवसायातील हातखंड्यामुळे रतन खत्री यांचं नाव महाराष्ट्रभर पोहोचलं होतं. रतन खत्री हे गेल्या काही दिवसांपासून मटका व्यवसायात सक्रीय नसले तरीही त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से आजही चर्चेले जातात. याबाबत ‘मिड डे’नं वृत्त दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून रतन खत्री यांच्या प्रकृती ढासळली होती. ते आपल्या कुटुंबासोबत मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत राहात होते. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती जास्तच बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

राज्य सरकारला समांतर व्यवस्था

राज्य सरकारच्या लॉटरीप्रमाणे एक समांतर लॉटरी व्यवस्था त्यावेळी चालायची. कामगार वर्गापासून अगदी उच्चभ्रू लोकांनाही त्या काळात या मटक्याने वेड लावले होते. अनेकांचे संसार उद्वस्त झाले होते. त्या काळात प्रत्येक मटका किंगच्या मागे कोणा गँगस्टरचा वरहस्त असायचा. पण खत्री सर्वांशी सलोखाचे संबंध ठेऊन होते. त्यामुळे कल्याण भगत पासून वेगळे झाल्यानंतरही मोठे खटके उडाले नसल्याचे एका माजी पोलिसाने सांगितले