सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता तबलिगी जमातच्या प्रमुखाची ईडी चौकशी होणार…

0
71

देशात कोरोना पसरवण्यात तबलिग जमातीचा मोठा हात आहे, हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळेच पोलिसांनी तबलिगीच्या मुसक्या आवळायला सुरुवात केलीय. तबलिगी जमातकडे पैसा येतो कुठून याची ईडीकडून तपासणी होणार आहे.

तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांना ईडीने मोठा दणका दिला असून त्यांची चौकशी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. साद यांच्याविरोधात पीएमएलएअंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यावेळी ईडी तबलिगी जमातला दिल्या जाणाऱ्या निधीची तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी मौलाना साद यांच्यासह 9 जणांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. मरकजमध्ये गर्दी जमवून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले होते. मरकजमध्ये हजारो लोक राहत होते. यावेळी त्यांच्या राहण्या-खाण्यासाठी कुठून निधी दिला जात होता, मरकजमध्ये भारतातील अनेक राज्यांतून आणि परदेशातून मोठ्या संख्येने लोक आले होते. यावेळी त्यांना कोणी स्पॉन्सर केलं वा त्यांच्या प्रवासाचा खर्च कोणी व कसा दिला? असा प्रश्न ईडीकडून उपस्थित करण्यात आला आहे.

देशात कोरोनाचा फैलाव होण्यास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असणाऱ्या तबलिघी जमातीची आता खैर नाही, कारण मरकज प्रकरण समोर आल्यानंतर आता तबलिगींच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली होती. दिल्ली पोलिसांनी मरकजचे अध्यक्ष मौलाना साद कंधालवी याच्यासहित कोअर कमिटीच्या सात सदस्यांना नोटीस धाडली होती.

पोलिसांनी कोअर कमिटीकडे मरकज आणि निजामुद्दीन स्थित मुख्यालयाचं फंडिंग कुठून येतं? याबद्दल माहिती देण्याची मागणी केलीय. आणि आता तर थेट ईडीकडून ही चौकशी होणार आहे.

मरकज सोडल्यानंतर अनेक लोक भारतातील विविध भागांमधील मशिदीत लपून होते. त्यांनी दिल्ली ते विविध भागांतील मशिदींपर्यंत प्रवास कसा केला? त्यांचा बस, हवाई वाहतूक, टॅक्सीचा खर्च कोणी केला? असेही प्रश्न ईडीकडून करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार दैनंदिन व्यवहारात जमात कॅशचा वापर करीत होते. ही कॅश कशी मिळाली याचा ईडीकडून तपास केला जाणार आहे. तबलिगी जमातला परदेशी फंड मिळत होता का? याचाही ईडीकडून तपास केला जाणार आहे.

१ जानेवारी ते १ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांची संख्या, नकाशा किंवा साईट प्लान आणि परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींचीही माहिती ‘जमात’ला द्यावी लागणार आहे. १२ मार्चनंतर सहभागी झालेल्या लोकांच्या माहितीसहीत ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग तसंच ओरिजनल रजिस्टरचीही पोलिसांनी मागणी केलीय. परदेशातून भारतात आलेल्या तबलिगींची संख्या, त्यांना मदत करणाऱ्या भारतीय व्हिजा कंपन्यांची नावंही पोलिस शोधत आहेत.

मरकजमध्ये सामील झालेल्या शेकडो तबलिगी जमातच्या कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झालीय. या कार्यक्रमात सामील झालेल्यांमुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोना झाल्याची प्रकरणं समोर येत आहेत. एकीकडे लॉकडाऊन असताना दुसरीकडे अत्यंत बेजबाबदार वर्तन तबलिगींकडून करण्यात आलंय. त्यामुळेच दिल्ली पोलिसांसह केंद्रीय गृह मंत्री अमित शहांनी याची गंभीर दखल घेतलीय. त्याचाच परिणाम म्हणून कोरोनाला जबाबदार असणाऱ्या तबलिगींची आर्थिक नाकेबंदी करुन मुसक्या आवळायला सुरुवात झालीय.