संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे – अनिल बोंडे
संपूर्ण देशभरात कोरोना या संसर्ग आजराने पाय पसरायला सुरुवात केली आहे.यासह राज्यातही कोरोनाचे संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच झाली आहे .पण सध्या यावरूनही राजकारण तापताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपाला गांभीर्य नसलेला पक्ष म्हटले होते . राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपा नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत,” असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.


अनिल बोंडे यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. “ही राजकारण करण्याची वेळ नाही. विरोधी पक्षावर टीका करणारे संजय राऊत हे कोण आहेत? ते शरद पवार यांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत. या परिस्थितीत केंद्रातील आणि राज्यातील सरकार सोबत आहे,”असे ट्विट बोंडे यांनी केला आहे .
