संचारबंदी असताना सामूहिक नमाज कार्यक्रम 45 ते 60 लोक पोलिसांच्या ताब्यात

0
51

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना सोलापूरमध्ये आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 45 ते 60 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नमाज पडण्यासाठी गेलेल्यांमध्ये लहानग्यांचाही समावेश होता. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे तब्बल 70 हून अधिक लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान, धुळ्यातही असाच प्रकार समोर आला आहे. एकत्र नमाज पठणासाठी गेलेल्या 36 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

एकीकडे डॉक्टर आणि परिचारिकांसह सर्व आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. दुसरीकडे तबलिगी समाजातील कोरोना संशयित खालच्या पातळीवर उतले आहेत. गाझियाबादच्या एमएमजीमध्ये दाखल झालेली जमती रुग्णालयातील कर्मचार्‍यांना सतत शिवीगाळ करीत आहे. इतकेच नाही तर या लोकांनी परिचारिकांसमोर कपडे बदलण्याचा प्रकार केला. आता जिल्हा प्रशासन तुरूंगातील बॅरेकमध्ये या लोकांना बंद करण्याचा विचार करीत आहे.

एकीकडे कोरोनाच्या महामारी चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन लोकांनी एकत्र येऊ नये, खबरदारी घ्यावी असे वारंवार आवाहन करत आहे. तर दुसरीकडे अशा पद्धतीने संचारबंदी मोडून एकत्र येणाऱ्या लोकांमुळे कायद्याचे उल्लंघन केले जात आहे.