श्रेय तुम्ही घ्या पण मजुरांना घरी आणा, प्रियांका गांधीचा योगींना सल्ला

0
118

श्रेय तुम्ही घ्या पण मजुरांना घरी आणा, प्रियांका गांधीचा योगींना सल्ला

ग्लोबल न्यूज: सगळंं काही करू इच्छितो मात्र राज्य सरकार आम्हाला साथ देत नाही, असा आक्रोश करत आहे. मात्र या दोघांच्याही भांडणात मजुरांचे मात्र हाल होत असल्याचं दिसत आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दरम्यान या योगी आदित्यनाथ यांच्या हेक्कड वृत्तीचा समाचार कॉंग्रेस सचिव प्रियांका गांधी यांनी घेतला. उत्तर प्रदेशमध्ये सध्या सुरू असलेल्या बसेसच्या मुद्द्याबाबत आपली बाजू मांडली. तसेच, त्यांनी योगी सरकारला या बसेसना परवानगी देण्यासाठी पुन्हा आवाहन केले. ‘तुम्हाला त्या बसेसवर भाजपचे झेंडे लावा, जर पक्षाचे पोस्टर त्यावर लावायचे असतील तर तेही करा किंवा मग या बसेसचे आयोजन तुम्हीच केले असे म्हणा; मात्र या बसेसना राज्यात येऊ द्या’ असे आवाहन प्रियांका गांधींनी केले आहे.

आपल्या सर्वांना आपली जबाबदारी समजून घेणे आवश्यक आहे. परराज्यांमध्ये अडकून पडलेले स्थलांतरीत कामगार हे फक्त भारतीय नाहीत, तर देशाच्या व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या मेहनतीवर आपला देश पुढे जातो. त्यामुळे आपल्या सर्वांचीच ही जबाबदारी आहे, की या संकटकाळात त्यांची मदत करावी. ही वेळ राजकारण करण्याची नाहीये, असेही गांधी म्हणाल्या.