ग्लोबल न्यूज: सोलापुरातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी रात्री च्या अहवालात सर्वाधिक 81 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तसेच आज सकाळी उपलब्ध झालेल्या माहिती नुसार 74 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

आज सकाळी जाहीर केलेल्या तपासणी अहवालात बार्शी तालुक्यातील जामगावातील मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी तिघांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती बार्शी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांनी दिली.
शुक्रवारी सांयकाळी सोलापूर येथे जामगावातील एक जण मयत झाला. त्याच्या कुटुंबातील बहीण, मुलगी आणि नात यांचे स्वॅब तपासणी साठी सोलापूर ला पाठवले होते आज सकाळी त्यातील तिघाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तसेच मयत झालेल्या व्यक्तीसोबत सोलापूर येथे असलेला त्याचा मुलगा तसेच मुंबई हुन आलेला मुलगा आणि सून या तिघांना1सोलापूर हुन बार्शीकडे येत असताना ताब्यात घेऊन क्वारनताईन करण्यात आले आहे.त्यांचे स्वॅब आज घेतले जाणार आहेत.

सध्या वैराग येथील एक आणि शेंद्री येथील एकावर उपचार सुरू आहेत.
दि.29/05/20 सकाळी 8
आजचे तपासणी अहवाल – 166
पॉझिटिव्ह- 74 (पु. 60 * स्त्रि- 14 )
निगेटिव्ह- 92
आजची मृत संख्या- 0
एकुण पॉझिटिव्ह- 822
एकुण निगेटिव्ह – 5772
एकुण चाचणी- 6594
एकुण मृत्यू- 72
एकुण बरे रूग्ण- 321